तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा नारायण राणेंचा करिष्मा..

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सदस्य निवडणूक मध्ये शिवसेना-भाजपला धोबीपछाड देत दोन्ही जागांवर काँग्रेसच्या कुडाळच्या नगरसेवका सौ संध्या तेरसे आणि सावंतवाडीचे नगरसेवक राजुभाई बेग यांचा दणदणीत विजय.

सिंधुदुर्ग:-जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सेना - भाजपाचा उडाला धुव्वा तर दोन्ही जागांवर कॉंग्रेसनेच मारली बाजी

तर नगरपरिषद मतदार संघातून कॉंग्रेसचे राजू बेग २९ मतांनी विजयी तर शिवसेनेच्या शुभांगी सुकींना पडली २३ मते

तर नगरपंचायत मतदार संघातुन कॉंग्रेसच्या संध्या तेरसे ४५ मतांनी झाल्या विजयी तर भाजपाच्या उषा आठल्ये यांना पडली ३९ मते

नगरपरिषद मतदार संघात शिवसेना व भाजपजवळ बहुमत असून सुद्धा कॉंग्रेसने दिला मोठा धक्का

नारायण राणे यांच्या दैनिक प्रहार या वृत्तपत्रात काल मंगळवारी दिलेल्या वृत्तात जिल्हा नियोजन समिती निवडणुकी पुर्वीच काॅग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू बेग यांचा पराभव मान्य करत शिवसेनेच्या शुभांगी सुखी यांचाच विजय निश्चित असे वृत्त छापले गेले.. त्यामुळे जिल्ह्यात एकच चर्चा सुरू होती..तर शिवसेनेमध्ये या बातमीमुळे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असतानाच मात्र माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे व आमदार नितेश राणेंनी  धक्कातंत्र वापरत शिवसेना भाजपला मोठा धक्का दिला आहे..

No comments:

Post a Comment