तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 September 2017

सेनगांव येथील विज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराने नागरीक त्रस्त

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- सेनगांव येथील विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला असुन सेनगांव शहरातील विजपुरवठा आज दि.०९ सप्टेंबर शनिवार राेजी सकाळ पासुनच बंद असल्याने विज वितरण कंपनीने कहरच केला असल्याने विज ग्राहक पुरते वैतागले असुन ग्राहक आता आदाेंलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसुन येत आहे.
सध्या कसल्याच प्रकारची लाेडशेडींग नसतांना तसेच सेनगांव येथील विज ग्राहकांना कसल्याच प्रकारची कल्पना न देताच ग्राहकाकडुन अव्वाच्या सव्वा विज बिल वसुली करीत आहेत. वाटेल तेव्हा विज बंद ठेवुन आपल्याच ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे काम येथील विज वितरण गेल्या अनेक दिवसापासुन करत असल्याचे नागरीक बाेलत आहे.सेनगांव शहरातील विज दिवसातुन अनेक वेळा जात असल्याने ग्राहकांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात या विषयी संपर्क केला असता ताे नंबर बंद अथवा उचलल्या जात नाही. सेनगांव शहरातील अनेक भागात तारेवर आकुडा टाकुन खुलेआम विजचाेरी हाेत असतांना ही संबधीत अधिकारी कानाडाेळा करीत आहेत. सेनगांव शहरातील नागरीक रितसर विजजाेडणी घेऊन दरमहा विजबिल भरुन ही येथील विज वितरण कंपनीकडुन नाहक त्रास देत असल्याच्या ग्राहकाकडुन बाेलल्या जात आहे.यामुळे वरीष्ठ अधिका-यांनी सेनगांव विज वितरण कंपनीमध्ये सुधारना घडवुन आनण्यासाठी लक्ष देण्याची मागणी सेनगाव शहरवासीयांतुन हाेत आहे.

No comments:

Post a Comment