तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 15 September 2017

आंबोली धबधबा अडकलाय सीमावादात

अनुज केसरकर

आंबोलीची शान आणि मान असलेल्या तसेच देशभर ओळखलेल्या जाणार्‍या आंबोली मुख्य धबधबा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. हा वाद चिघळला जाण्याची शक्यता आहे! यामागे वनविभागच्या काही अधिकार्‍यांच्या छुप्या पद्धतीने हात असून त्यांचा पारपोली वनकमिटीला हाती घेऊन गुप्त मिटिंग करत पारपोली ग्रामस्थांना प्रोत्साहित करून ग्रामपंचायतीमार्फत आंबोली मुख्य धबधब्याचे नाव बदलण्याचा ठराव मांडण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत! सध्या आचारसंहिता असल्याने नाव बदलण्याचा ठराव आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पारपोली ग्रामपंचायत येथे सभा घेतली. त्यामध्ये आंबोली मुख्य धबधबा नाव बदलणे आणि शिवतीर्थ धबधबा पारपोली करण्याचा मुद्दा होता.

आंबोली धबधब्याचा इतिहास आणि वाद

कोकणचे महाबळेश्‍वर अशी ओळख असलेल्या आंबोलीच्या पर्यटनाला दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून येतात. तसेच दररोज हजारो प्रवासीही नयनरम्य नागमोडी घाटातून पर्यटनाचा अविस्मरणीय आनंद घेतात. आंबोली घाटातील मुख्य धबधबा म्हणजे खरी ओळख आंबोली हिल स्टेशनची! याच घाटातील मुख्य धबधबा पावसाळ्यात प्रवाहीत झाल्यावर आंबोलीचे वर्षा पर्यटन सुरू होते आणि लाखो पर्यटक येथे भेट देतात. यावर अनेक स्थानिक व्यावसायिक अवलंबून असतात.

यंदा पर्यटनस्थळांवर पर्यटन कर शुल्क आकारणे चालू झाले. अर्थात जिल्ह्यात सर्वात जास्त कर वसूली आंबोली मुख्य धबधब्यावर होते. याचाच फायदा घेण्यासाठी काहीं अधिकारी व कर्मचारी आंबोली मुख्य धबधब्यावरून वाद होईल, अशी स्थिती निर्माण करत आहेत. पारपोलीच्या वनसमितीला हाताशी धरून आंबोलीची ओळख काढून घेण्याचे कारस्थाने केली जात असल्याची चर्चा आहे. यंदा मुख्य धबधब्यावर प्रत्येकी १० रु. पर्यटन कर आकारणीचे ठरल्यावर संबंधित अधिकारी व पारपोली वन कमिटीने गोपनीय मिटिंग घेत पारपोली ग्रामस्थांना थापा देत प्रोत्साहन करत आंबोली बद्दल भडकवण्याचे प्रयत्न सुरू केलेत, अशी चर्चा पावसाळ्या आधीपासून आजवर होत होत्या. मात्र, आंबोली-चौकुळ च्या ग्रामस्थांनी या चर्चांकडे दुर्लक्ष केल्याने आज काहींची मजल आंबोलीचे अस्तित्व अंतर्गत फायद्यासाठी हिस्कावण्याची पोहचली आहे! तशा हालचाली होत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले!

यंदा पर्यटनस्थळांवरील कर आकारणीच्या शासनाच्या निर्णयामुळे आणि येथील धबधब्यावरील जो दरदिवशी हजारो, लाखोंचा पर्यटन कर जमतो तो पाहून मुख्य धबधब्याचे नाव बदलून शिवतीर्थ धबधबा पारपोली करण्याचा ठराव ग्रामपंचायतीकडून घेवून नाव बदलण्याच्या अंतर्गत हालचाली केल्या जात आहेत. मात्र, घाटातील व मुख्य धबधबा येथील कोणतेही अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच जैवविविधता टिकवण्यास आणि घाटमार्गात व घाटातील अनेक घटनांमध्ये स्थानिकच पुढे असतात आणि धबधब्यावर पर्यटन कर आकारणीची सुरुवात ही तिन्ही गावांच्या वनसमित्या व ग्रामपंचयातीमार्फत संयुक्‍तरित्या वनविभागाने करावी, असे ठरले होते!

आंबोली-चौकुळ-पारपोली या तिन्ही वनबीटातील वनसमित्या व ग्रामस्थ यांना संयुक्‍तरित्या बैठका घेवून चर्चा करणे अपेक्षित होते. पण असे झाले नाही. याउलट पारपोली वनसमितीला हाती घेवून वनविभागातर्फे पर्यटन कर आकारणी वनविभागाने यावर्षीपासून सुरू केली. आंबोली वनसमितीला ही करातील रक्‍कम मिळणे आवश्यक असताना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावर्षी पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रुपये पर्यटन कर आकारुन लाखोंचा निधी जमवण्यात आला.या पर्यटन कर आकारणीची आणि मिळालेल्या रक्‍कमेची चौकशी करुन त्यात भ्रष्टाचार झाला की नाही? पर्यटनकराच्या रक्‍कमेचा योग्य वापर झाला की नाही? याची चौकशी करण्याची मागणी आंबोली- चौकुळ ग्रामस्थांमधून होत आहे.

आंबोली मुख्य धबधब्याचे नाव बदलण्याचे कारस्थान करत आहेत ही गंभीर बाब आहे. मनमानी करुन विश्‍वासात न घेता जर कोणी आंबोली धबधब्याचे नाव बदलण्याचे कारस्थान केल्यास मुख्य धबधब्यावर जाणार्‍या पर्यटकांची वाहने आंबोली- चौकुळ गावच्या परिसरात व घाटात उभी करू देणार नाही. तसेच कोणतेही घटना घडल्यास आंबोलीतील स्थानिक सहकार्य करणार नाहीत. जर आंबोलीची ओळख हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत व मुख्यमंत्र्यांकडे याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार  असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.आंबोलीच्या अस्तित्वाला बाधा न पोहचवता नवीन वनकमिटी बनवून आंबोली-चौकुळ-पारपोली वनकमिटी व ग्रामस्थांना विश्‍वासात घेवून शांतेतेचा मार्ग काढणे आवश्यक आहे, ग्रामस्थामच्या प्रतिक्रीया

आंबोली घाटाला इतिहास आहे.आंबोली घाट इंग्रजांपासून हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे.तसेच घाटातील मुख्य धबधबा हा आंबोलीची ओळख देशभर आहे. शासनाच्या पर्यटनकराचा निर्णय झाल्यावर उपजिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या मिटींगमध्ये आंबोली मुख्य धबधब्यावर आंबोलीचा हक्‍क आहे. वनविभागच्या हद्दीत आता धबधबा येतो म्हणून आंबोली-चौकुळ व पारपोली वनसमित्यांना व ग्रामस्थांना विश्‍वासात घेवून वनविभागाने संयुक्‍त रित्या पर्यटनकर आकारावा, असे सांगूनही वनविभागाने पारपोली वनसमितीला पुढे करत कर आकारणी सुरु केली. आता जर आंबोलीची
ओळख असलेल्या धबधब्याचे नाव बदलण्यासाठी हालचाली केल्यास त्या खपवून घेतल्या जाणार नाही. त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून तीव्र आंदोलन केले जाईल तेव्हा संबंधित जबाबदार असतील.

विलास गावडे, उपसरपंच, आंबोली .

..हा तर आंबोलीची ओळख पुसण्याचा प्रयत्न
आंबोली घाट आणि धबधबा मुख्य धबधब्याल्या जागतिक स्तरावरील ओळख आहे. शासन व जिल्हा नियोजनकडून लाखो-करोडोंची विकासकामे ही आंबोली वनसमिती व ग्रामपंचायत मार्फत होतात. दरवर्षी लाखो पर्यटक घाटातील मुख्य धबधब्याला भेट देतात. असे असताना नाव आंबोलीचे नाव बदलणे म्हणजे अस्तित्वच हिसकावणे होईल आणि असे झाल्यास आमचा तीव्र विरोध असेल.

दिलीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक.

आम्हा आंबोली ग्रामस्थांच्या पाठीशी आंबोली मुख्य धबधब्याचा नाव बदलण्याचा जो खेळ खेळला जातो त्याचा निषेध आम्ही चौकुळ ग्रामस्थ करत असून आम्ही ग्रामस्थ आंबोली व चौकुळ वनसमिती यांच्या सोबत तीव्र आंदोलन करुन जे संबंधित अधिकारी काहींना हाताशी धरून आंबोली धबधबा व घाटाचा इतिहास बदलण्याचे प्रयत्न करत आहेत ते हाणून पाडू आणि आंबोली ग्रामस्थांसोबत या आंदोलनात आम्ही शेवटपर्यंत साथ देवू.

No comments:

Post a Comment