Breaking News
Loading...

Tuesday, 12 September 2017

पत्रकारानों समाजाच्या विकासासाठी लेखणीचा उपयोग करा


श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष - नितीन पगार

महेन्द्र महाजन जैन रिसोड

  रिसोड ता.9 सप्टेंबर17= श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन  स्थानिक  माऊली  संकुलामध्ये ता.9 सप्टेंबर ला संपन्न झाले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक  म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा  अध्यक्ष  नितीन पगार यांनी  उपस्थित  पत्रकार बांधवाना वरील प्रमाणे  मार्गदर्शन  केले.यावेळी उद्घाटक म्हणुन तहसीलदार आर.यु.सुरडकर.ठाणेदार राजेंद्र  पाटील.नगराध्यक्ष यशवंतराव  देशमुख होते.
श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उध्दगाटन तहसिलदार आर.यु.सुरडकर ठाणेदार राजेंद्र  पाटील  नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख जिल्हाध्यक्ष पगार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत श्रमिकपत्रकार संघाचे राज्यसदस्य नागेश घोपे.अतिश देशमुख तालुकाअध्यक्ष दिपक कुदळे होते .तद्वतच आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे  मान्यवरानी पुजन केले आले.यावेळी तहसीलदार  सुरडकर यांनी पत्रकार हा लोकशाहीचा  चौथा  आधारस्तंभ आहे.शासणाच्या प्रत्येक  बाबीचा प्रचार_प्रसार करण्यासाठी पत्रकाराचे मोलाचे योगदान लाभते.त्यामुळे पत्रकारांची भुमिका  हि प्रत्येक  बाबतीमध्ये  महत्वाची ठरते.तर ठाणेदार राजेंद्र  पाटील यांनी विचार व्यक्त  करताना म्हटले कि दैनंदीन जिवनामध्ये प्रत्येक बाबीकडे लक्ष देण्याचे काम पोलिस प्रशासाचे आहे. परंतु एखादी घटना घडल्यास पोलिस प्रशासना आगोदर पत्रकार त्या घटनेची माहिती प्राप्त  करतात. त्यामुळे  सुतावरून स्वर्ग  गाठण्याची  कामगीरी  फक्त  पत्रकारच करु शकतात.तर जेष्ठ  पत्रकार  नितीन पगार यांनी  विचार व्यक्त  करताना पत्रकारीतेची लेखणी हि सत्याच्या मार्गानेच चालली पाहीजे.वंचितांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारानी आपली लेखणी झीजवीने आवश्यक आहे. आशाप्रकारे विचार मांडले .तत्पूर्वी  मान्यवरांचे रिसोड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  स्वागत  करण्यात आले.यावेळी  प्रणय निर्बान. मराठी  पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष  पि.डी.पाटील.सतिष चोपडे. संतोष गोभाशे.गजानन बानोरे.प्रा.रविंन्द अंभोरे.सचिव विवेकानंद  ठाकरे.दिपक सोनुने .गोपाल खडशे.तुकाराम फुके.संतोष चर्हाटे.अर्जुन पाटील खरात.सुरेश गीरी .शेख अन्सोरौदीन. आनंत भालेराव.रूपेश बाजड बन्टी देगावकर गजानन गाडे.महादेव घुगे.महेंद्र महाजन. युवा कवी चाफेश्वर गांगवे यानी केले.तर आभार संतोष गोमासे  यांनी मानले.

महेन्द्र महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment