Breaking News
Loading...

Sunday, 17 September 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते परभणी येथे मुख्य ध्वजारोहण संपन्न.

परभणी दि. 17 – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परभणी येथील राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच एक मिनिटे स्तब्ध राहुन अभिवादन करण्यात आले. पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलीस अधिक्षक दिलीप झळके, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपाध्यक्षा भावना नखाते आदि मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्मांना आदरांजली वाहिली.

क्रांती चौकात अभिवादन...
शहरातील क्रांतीचौक येथील हुतात्मा स्तंभास पालकमंत्री पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले तत्पूर्वी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.आर.बी.देशपांडे यांच्या प्रतमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नाटय कलावंत व कलाक्षेत्रातील पारितोषिक प्राप्त गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बालनाथ देशपांडे आणि इतर सहका-यांनी मुक्तीलढयातील योगदानाची माहिती दिली.

No comments:

Post a Comment