तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

तेलंगणातिल "त्या" वादगस्त पुस्तकावर बंदी घाला ---प्रदिप कोकडवार


जिंतूर
हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटी चे प्रोफेसर कांचा इलिया या वादगस्त लेखकाने  लिहिलेल्या आर्य वैश्य कोमटी समाजासंबंधीच्या एका पुस्तकावर वैश्य संघटनेने आक्षेप घेतला होता. या पुस्तकाचे शीर्षक आणि यातील काही मजकूर हा वैश्य समाजासाठी अपमानास्पद असल्याचे या संघटनेचे म्हणणे होते. हे पुस्तक तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणीही या संघटनेने केली होती. या प्रकरणी प्रो कांचा इलाया यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे आंध्रप्रदेशातील आर्य-वैश्य महासभेचे अध्यक्ष जे. व्यंकटेश्वर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. या गंभीर प्रकराचे आंध्रप्रदेश तेलंगणा तामिळनाडू राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत हैद्राबाद येथे गेल्या तीन दिवसा पासून बंद मोर्चे रस्ता रोको,अशी विविध अंदोलन वाढत असून सर्व राजकीय पक्षांनी या पुस्तकावर बंदी ची मागणी केली आहे या लेखकाचे सर्वत्र पुतळे पण जाळले असून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत महाराष्ट्र राज्यात पण विविध ठिकाणी या घटनेचा आणि वादग्रस्त पुस्तक लेखक यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी निषेध केला आहे लवकरच पुस्तक बंदी च्या मागणी साठी निवेदन देण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यात पण सर्वत्र निशेध व्यक्त होत आहेतर सोशल मीडिया वर निषेधार्थ पोस्ट चालू आहेत अश्या घटनांचा समाजानं एकजुटीने पुढं येऊन निषेध करावा आणि पुस्तकात तात्काळ बंदी घालावी अशी मागणी आरक्षण समिती चे अध्यक्ष प्रदिप कोकडवार यांनी केली आहे


No comments:

Post a Comment