तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा कबड्डी संघ तालुका स्तरावर प्रथम


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी    
सोनपेठ : नुकत्याच नृसिंह विद्यालय नरवाडी येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये     कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या संघाने 19 वर्षाखालील गटात महालिंगेश्वर उ.मा.विद्यालयाच्या संघावर 38/2 ने विजय मिळवला.त्यानिमीत्ताने महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा. परमेश्वररावजी कदम, मा. आमदार व्यंकटरावजी कदम ,मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड पाटील, रोटरी क्लब चे अध्यक्ष बालमुकूंद सारडा ,चंद्रकांत लोमटे ,प्राचार्य डॉ. वसंत सातपुते ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यां शेख शकीला, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, प्रदीप गायकवाड , प्रा.गोविंद वाकणकर  सर्व प्राध्यापक व कर्मचारी  यांनी  विजयी संघाचे  अभिनंदन केले. यावेळी संघास  मार्गदर्शन प्रा. सतिश वाघमारे यांचे लाभले.

No comments:

Post a Comment