Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

विजेचा शाॅक लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

कार्तिक पाटील

पाथरी तालूक्यातील सारोळा (बु) येथील घटना

पोलीसात आकस्मीक मृत्युची नोंद

पाथरी / प्रतीनिधी
एका 35 वर्षीय तरूण शेतकऱ्याचा विजेचा शाॅक लागुन मृत्यू झाल्याची घटना गुरूवांर 14 सेप्टेबर रोजी तालूक्यातील सारोळा (बु) येथे घडली असुन या प्रकरणी पाथरी पोलीसात अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
   या बाबत पोलीस सुत्रा कडुन मिळालेल्या माहीती नुसार  पाथरी तालुक्यातील सारोळा बु.येथील रहीवाशी असलेले ज्ञानोबा मारोतराव रनेर वय वर्ष 35  हे गुरुवार 14 सप्टेबर रोजी सकाळच्या 10 च्या सुमारास घरासमोर उभारलेल्या जणावराच्या गोठयात गेले असता गोठा पत्राचा असल्याने त्यात विजेचा प्रवाह उतरुन त्यास रणेर यांचा स्पर्श होताच जोरदार शाॅक लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला  या प्रकरणी मयताचे बंधु मुंजाभाऊ मारोतराव रनेर यांनी पाथरी पोलीसात दिलेल्या खबरेवरुन पाथरी पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा अधिकचा तपास ए.एस.आय.जी.आर. कालापहाड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment