तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

ऑनलाईन जात प्रमाणपत्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप

 

परभणी : शासनाने पारदर्शक, कार्यक्षम व समयोचीत लोकसेवा देण्यासाठीच्या नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन पात्र व्यक्तींना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत महसुल व अन्य विभागाने त्यांचे अधिनस्त विविध सेवा अधिसुचीत केल्या आहेत. त्यानुषंगाने परभणी जिल्हयात सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र 01 ऑगस्ट 2017 या महसूल दिनापासुन परभणी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे निर्गमीत करावे असे जिल्हा प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केलेले होते. त्यानुषंगाने परभणी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र नागरीकांना ऑनलाईन वितरीत करण्यात येत आहेत. परभणी उपविभागातील पहिले ऑनलाईन जात प्रमाणपत्र कु.अश्विनी बालाजी दैठणकर यांना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर व उपविभागीय अधिकारी डॉ.सुचीता शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्री पी.एल. जुकटे, श्री कपील पेंडलवार, श्री निलेश माकोडे, श्री विजयकुमार भिसे, श्री सचिन शेटे, श्री अंगद सावंत उपस्थित होते. त्याअनुषंगाने सर्व नागरीकांनी महाऑनलाईनच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी परभणी यांनी केले आहे.     

No comments:

Post a Comment