तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

‘२६/११’ प्रकरणाची पुन्हा चौकशी करा! मुंबई उच्च न्यायालयात याचिका


मुंबईसह देशाला हादरवून सोडणाऱ्या २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करा अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर,अशोक कामटे या पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांचा यात बळी गेला. या हल्ल्यात अटक करण्यात आलेला मुख्य दहशतवादी अजमल कसाब याला फाशीही देण्यात आली. मात्र करकरे, साळसकर आणि कामटे यांना दुय्यम दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट्स पुरविण्यामुळे त्यांचा बळी गेला असा अर्जदाराचा आरोप आहे.

दरम्यान, ही याचिका दाखल करणारे अर्जदार सुनावणीदरम्यान सातत्याने गैरहजर राहत असल्याने न्यायमूर्ती भूषण गवई आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यासाठी अॅड. मनोज मोहिते यांची ऑमिकस क्युरी म्हणून नेमणूक केली...

No comments:

Post a Comment