तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

संत मदर तेरेसा जयंतीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न...!


पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सोशल संस्था,सदशिवराव निवासी प्रशाला अँड ज्यु. कॉलेज,डायमंड इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल यांचे विद्यमाने नोबेल पुरस्कार प्राप्त संत मदर तेरेसा जंतिनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
  सदर व्याख्यानमालेत विशेष अतिथी नाबार्ड महाप्रबंधक मा.बी.बी घाडगे,भारिप बहुजन सांगली नेते अरुण वाघमारे,सोशल संस्था संचालिका डॉ.पंचशीला लोंढे,रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाइंजे,ऑडिटर अशोकराव तडवळकर सर,NDMJ सचिव वैभव गीते,सरपंच रशीद पठाण,राहुल वाघम्बरे,कराटे अध्यक्ष सतीश शिंदे इ. प्रमुख पाहुण्यांनी  संत मदर तेरेसा यांचे जीवन,कार्य,समाजसेवा,रोगी,पीडित विषयी असणारी रुग्ण सेवा ,भारतीय लोकशाही,महापुरुषांचा इतिहास अशा विषयी सलग बारा दिवस व्याख्यानात भाग घेऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर शिक्षणदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रप्रमुख मगर सर,तोरणे सर,प्रा.घोडके मॅडम,प्रा.ए.पठाण आदींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी या व्याख्यानमालेचा उद्देश सांगून अजून भरीव कार्य करणार असा मनोदय व्यक्त केला.कार्यक्रमास मनोज जगदाळे,जितेंद्र देठे मामा,प्रा.देवकाते,मुख्यध्यापक धनाजी लोंढे इ.उपस्थित होते.सूत्रसंचालन खरात सर यांनी केले तर सर्व कार्यक्रमाचे नियोजन बारावी student केले आभार बागाव मॅडमनि मानले.......

No comments:

Post a Comment