तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

वीजेचे खांब पडल्यामुळे दोन दिवसापासुन परतूर शहरातील पाणी पुरवठा बंद

परतूर
गेल्या दोन दिवसापुर्वी पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे पाणी पातळीत वाढ झाली यामुळे नगर परिषदच्या नविन पाईपलाईनच्या पाणी प्रकल्पाला वीजपुरवठा करणारे विजेचे खांब पाण्याखाली गेल्यामुळे तसेच काही खांब पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पडले यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला परिणामी गेल्या दोन दिवसापासुन परतूर शहरातील मोंढा भागा मधील 10-12 काॅलनीमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला नाही .यामुळे नागरिकांना न.प च्या पाईपलाईनच्या पाण्याला मुकावे लागले आहे.सध्या दसरा सणाचे दिवस असल्यामुळे पाण्याची उणीव भासत असल्याने महिला वार्गात नाराजीचा सुर जाणवत आहे. या तुटलेल्या विजेच्या पोलचे काम महावितरण तर्फे चालु असुन पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे.आज सोमवार दुपार पर्यंत वीजेचे काम पुर्वत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

No comments:

Post a Comment