Breaking News
Loading...

Sunday, 10 September 2017

जिल्हा कचेरीवर मुक मोर्चा

परभणी :  प्रतिनिधी
 म्यानमार येथील मुस्लीम समाजावरील करण्यात येत असलेले अत्याचार थांबवण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी इदगाह मैदान येथुन शहरातील प्रमुख रस्त्यावरुन रविवारी दुपारी २ वाजता परभणी मुस्लीम इन्साफ कौंसिलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा नेण्यात आला. या मुकमोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकाºयांना मोर्चेकºयांच्या वतीने मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये म्यानमार येथे मुस्लीम समाजावर होत असलेले अत्याचार त्वरीत थांबवण्याची मागणी करत आतंकवाद, असहिष्णुता थांबवुन भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघाकडे रोहिंग्या मुस्लीम बांधवांना न्याय मिळवुन द्यावा या मागणीसह  ट्रीपल तलाक संदर्भात इस्लामीक शरियत मध्ये हस्तक्षेप थांबवावा आणि इस्लामी शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप करु नये, लव जिहाद च्या नावाखाली देशामध्ये वेगवेगळे आरोप करुन मुस्लीम समाज बांधवांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. या प्रकारात निष्पाप लोकांना बळी करण्याचे काम थांबवावे या व अन्य मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. इदगाह मैदानापासुन शिवाजी चौक, स्टेशन रोड मार्गे हा मोर्चा शिवाजी पुतळा प्रांगणात पोहचला. हाफीज मौलाना, महमद रफियोद्दीन
अशरफी, हफीज सय्यद निसार अहेमद, मौ.अ.कदीर मिल्ली, स.समी, हफीज चाऊस, वसीम कबाडी, वसीम, जान महमद जानु, गुलमीर खान, उबेद शालीमार, गौस आदींनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment