तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

पुण्यात तडीपार गुंड पप्पू सातपुतेची धारदार शस्त्राने हत्या.


_________________________

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील सराईत गुन्हेगार सुशांत उर्फ पप्पू सातपुते याचा धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. कोळवण येथील पोलिस चौकीसमोर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याला पप्पू नावाने ओळखत असत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हाणमारीचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपारही करण्यात आलं होतं. कोळवण परिसरात त्याचं यापूर्वीही भांडण झालं होतं. त्यामुळे त्याला मारण्यात कोळवण परिसरातीलच काही तरुणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. यासंदर्भात पौंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

No comments:

Post a Comment