तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

कर्नाटकातील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाकडून निषेध

प्रतिनिधी । शिऊर
कर्नाटकातील 'लंकेश पत्रिका' च्या संपादिका तसेच जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात येऊन कडक शिक्षा व्हावी असे वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने वैजापूरच्या नायब तहसील दीपाली खेडेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

देशातील तथाकथित धर्माच्या ठेकेदारांकडून धर्माविरुद्ध बोलणाऱ्या निर्भीड आणि रोखठोक विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. बंगलोर येथील जेष्ठ आणि निर्भीड पत्रकार यांचा मागील आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून खून करण्यात आला. हत्येचा उद्देश गौरी लंकेश यांचा प्रस्थापित धर्मांधते विरुद्ध उठणारा आवाज दाबने आणि त्यांची लेखणी चिरडणे हा होता मात्र, त्यांचा विचार आणि लेखणी कधीच चिरडल्या जाणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लंकेश यांचा खून होऊन आठवडा उलटला तरी अद्याप खुन्यांना पकडण्यात सरकारला अपयश आले असल्याने पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. खुण्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पगारे, सचिव रमेश राऊत, कोषाध्यक्ष ताराचंद वेळंजकर, सल्लागार नूरभाई उमर, शांताराम मगर, सुधीर बागुल, तैमूर सय्यद, प्रा.आबासाहेब कसबे, अर्जुन तेलंगे, सागर देवकर, चंद्रकांत हारदे, गणेश सावंत, विजय त्रिभुवन आदी उपस्थित होते.

फोटो:

No comments:

Post a Comment