तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

दाऊदला मोठा झटका, लंडनमधील अब्जावधींची संपत्ती जप्त

.

_________________________

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणात भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने दाऊद इब्राहिमची लंडन मधील अब्जावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तान मध्ये असल्याचं कळतं.

लंडन मधील दाऊदची संपत्ती...

– लंडनच्या हर्बर्ट रोडवर दाऊदने 35 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती.

– स्पिटल स्ट्रीटवर दाऊदचं 45 खोल्यांचं आलिशान हॉटेल आहे.

– रोहॅम्पटन  मध्ये दाऊद इब्राहिमची कमर्शिअल बिल्डिंग आहे.

– लंडनच्याच जॉन्सवूड रोडवर दाऊदचं मोठं घर आहे.

– याशिवाय शेफडर्स बुश, रोमफोर्ड क्रोयदो मध्ये हॉटेल आणि संपत्ती आहे.

21 नावं बदलून संपत्तीची खरेदी मागील महिन्यातच ब्रिटीश सरकारने आर्थिक निर्बंधा बाबतच्या यादीत दाऊदचाही समावेश केला होता. या यादीतदाऊदची तीन ठिकाणं आणि 21 उपनामांचा उल्लेख केला आहे. म्हणजेच दाऊदने 21नावं बदलून संपत्ती खरेदी केली होती.पाकिस्तानात दाऊदचे तीन पत्ते युनायटेड किंग्डमने जारी केलेल्या असेट्स फ्रीज लिस्ट मध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचा उल्लेख आहे.

या यादीनुसार, ‘कासकर दाऊद इब्राहिम’चे पाकिस्तानातील तीन पत्ते असे आहेत…

– हाऊस नं. 37, गली नंबर 30, डिफेन्सहौसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान

– नूराबाद, कराची, पाकिस्तान

– व्हाईट हाउस, सौदी मस्जिद जवळ क्लिफ्टन, कराची

दाऊदची संपत्ती किती..?

फोर्ब्स मॅगझिन नुसार मोस्ट वॉण्टेड गँगस्टरपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे. दाऊद हा जगभरातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर आहे.

याआधी यूएई सरकारचीही कारवाई ...

या आधी यूएई सरकारनेही दाऊद इब्राहिची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर यूएई सरकारने हे पाऊल उचललं होतं.

No comments:

Post a Comment