तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

वरपूडकर महाविद्यालयात स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या तायक्वांदो स्पर्धा संपन्न


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या "ड" झोन तायक्वांदो स्पर्धा १० सप्टेंबर रोजी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून  संपन्न झाल्या. स्पर्धेच्या ऊद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, प्रमुख पाहूणे संत जनाबाई महा.गंगाखेड येथील डाॅ.चंद्रकांत सातपुते, डाॅ.साहेबराव देवकते(नागनाथ महा.औंढा) यांच्यासह तालुका क्रिडा संयोजक सुमित लांडे, प्रा.डाॅ.बापूराव आंधळे हे ऊपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण चार महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून तायक्वांदो असोशिएशन परभणी चे  श्री ख्वाजा अन्सारी, हुसेन पठाण, अखिल चौधरी, विलास मस्के, अमन खान, प्रल्हाद राठोड व डाॅ.गुरूदास लोकरे, डाॅ.विनोद गणाचार्य, प्रा.पवन पाटील यांनी काम पाहिले. तर संघव्यवस्थापक म्हणून प्रा.संतोष कोकिळ (शिवाजी महा.परभणी), प्रा.नलगे जी.बी.(शिवाजी महा.हिंगोली) प्रा.अतिष खंदारे यांनी सहभाग नोंदवला. अतिशय प्रसन्न वातावरणात या एक दिवशीय ड झोन स्पर्धा पार पडल्या. यामध्ये प्रथम क्रमांक शिवाजी महा.परभणी, द्वित्तीय क्रमांक शिवाजी महा.हिंगोली तर तृतीय क्रमांक शारदा महा.परभणी यांनी पटकावला. सायंकाळी ५:३० वाजता सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रिडा संचालक गोविंद वाकणकर यांच्यासह क्रिडा समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. महालिंग मेहत्रे, प्रा.अंगद गायकवाड, प्रा.सुरेश मोरे, प्रा.जीवन भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व स्पर्धक खेळाडू, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बाबुराव फड, संतुक कुलकर्णी, संतुक परळकर, चंदू पटके, भागवत हाके यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment