तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

विद्युत मंडळाच्या ईपीएस पेन्शनर्सची बैठक संपन्न


परभणी :  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या इपीएस ९५ पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील सिटी फंक्शन हॉल येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीस चांगला प्रतिसाद मिळाला. बैठकीच्या पहिल्या सत्रात पेन्शन, पेन्शन बजेट, वाढ व आतापर्यंत या संबंधात करण्यात आलेली आंदोलने व पुढील कारवाया संदर्भात एम.आर.जाधव यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष पी.डी.चामणीकर, उपाध्यक्ष विजय कुपटेकर, कोषाध्यक्ष अरूण पेडगावकर, सचिव जी.जी.कुलकर्णी, सहसचिव एन.बी.वर्मा, संघटन सचिव वाय.बी.पतंगे यांची तर सदस्य म्हणून बी.एन.मंचेवार, पी.आर.देशमुख, नारायण कोकंडे, बी.पी.कटकुरी, आर.एस.शहाणे, बी.बी.रेंगे आदींची निवड करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन चामणीकर यांनी केले तर आभार अरूण पेडगावकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment