तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

गंगापूर महसूल कर्मचारी संघटनेचे एकदिवसीय लेखनी बंद आंदोलन


   गंगापूर : तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि तलाठी शिवाजी मुरकुटे यांना धक्काबुकी व मारहाण करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले आहे़ या आंदोलनात तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने महसूलचा कारभार दिवसभर ठप्प पडला होता .
       अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़. राहुल गांधी यांच्या सभेच्या दिवशी कर्तव्यावर उपस्थित असलेले परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना सभामंडपात जाण्यास मज्जाव करण्यात आला़. तहसीलदार कडवकर यांनी स्वत:ची ओळख देवून ओळखपत्र दाखविल्यानंतरही अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्यांना धक्काबुक्की करून सभामंडपात प्रवेश दिला नाही़. तालुकास्तरीय दंडाधिका-यांना दिलेली ही वागणूक निषेधार्ह असून, या विरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनांबरोबरच महसूल कर्मचारी संघटनांनीही आंदोलनाची भूमिका घेतली़ आहे असे गंगापूर महसूल कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष करण जारवाल यांनी सांगितले.
    यावेळी  गंगापूर महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव संदिप वाडीकर ,कार्याध्यक्ष रामदास बोठे ,बागेस एफ ए ,बाबुलाल कादर ,एच एन जगताप,ए बी चिकड ,एम एन क्षीरसागर,कचरु तुपे आदि कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment