तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

देवभक्ती सह देशभक्ती करणारा समाज निर्माण व्हावा

प्रदिप कोकडवार
जिंतूर:-आज देवभक्ती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र देशभक्ती करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेत कमी आहे देवभक्ती करत असताना आपण आपल्या देशाची सेवा परंपरांचे जतन आणि राष्ट्रभक्ती हे गुण समाजात रुजवणे अत्यंत आवश्यक आहे.त्याशिवाय भारताला महासत्ता बनवता येणार नाही असे प्रतिपादन भागवताचार्य  प्रशांत महाराज खानापुरकर यांनी
जिंतूर तालुक्यातील
 चारठाणा येथे श्री ह.भ.प नामदेव महाराज चारठाणकर यांनी विठ्ठल महाराज घुले आणि आईवडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त चार दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यातील पहिले कीर्तन पुष्प प्रशांत महाराज खानापूरकर (लातूर) यांनी  श्री संत तुकाराम महाराजांच्या     
देवा हि माझी मिरासी / ठाव तुझ्या पायापासी //
याचा धरीन अभिमान / करीन अपुले जतन // या अभंगावर निरुपण केले.ते पुढे बोलताना म्हणाले कि आज प्रत्येक आईवडील मुलाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात.परंतु मुले मात्र आईवडिलांच्या सुखाचा विचार करत नाहीत् हि भावनाहीन समाजाचे लक्षण आहे.आपण मोठे झालो ते कोणामुळे याची जाणीव ठेवली पाहिजे.ज्या आईवडीलानी आणि श्रीगुरूने आपला संभाल केला शिक्षण दिले त्यांनी वार्धक्यात आधार देणे आपले कर्तव्य आहे.
आई वडिलांना मुलाच्या गुरूला शिष्याच्या कर्तबगारीचा अभिमान असतो आणि तो जरूर असावा भारताचे राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा यांची सांगड या अभंगाशी घालताना ते म्हणाले कि आज देशाच्या समोर अनेक संकट आहे चीन सारखा देश आपल्याविरुद्ध युद्धाची भाषा बोलत आहे आणि आपण मात्र चीनी वस्तूचा वापर करत आहोत.देशभक्ती करण्यासाठी केवळ सीमेवर जाऊन लढाई करावी लागते असे नाही तर आपण घरी बसून परदेशी वस्तूचा बहिष्कार घातला पाहिजे.त्यामुळे आपल्या देशातील पैसा शत्रूच्या राष्ट्रात जाणार नाही .कारण देवभक्त बनत असताना देशभक्त बनलेच पाहिजे.केवळ पंतप्रधान मुख्यमंत्री आणि अधिकारी यांनीच देश सुधारायचा प्रयत्न करून चालणार नाही तर या मोहिमेत आपण सर्वांनी हिरीरीने भाग घेतला पाहिजे. स्वच्छ भरत सशक्त भारत बनविण्यासाठी आपण सर्व एकत्र येवून काम करावे.
ह भ प नामदेव महाराजांनी आपल्या आईवडिलांची आणि गुरूची पुण्यतिथी साजरी केली हा आदर्श त्यांनी आपल्याला घालून दिलेला आहे.या बद्दल महाराजांचे आभार मानले.विविध सामाजिक विषयाला स्पर्श करून अभंगाचे विवेचन त्यांनी केले.यावेळी नामदेव महाराज दशरथ महाराज पंजाब महाराज आसाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गणेश महाराज जनार्धन महाराज यांच्यासह बहुसंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment