Breaking News
Loading...

Thursday, 7 September 2017

जप्त केलेला वाळू साठा चोरीचा प्रयत्न ग्रामस्थानी हानुन पाडला

पाथरी/प्रतिनिधी:- तालुक्यातील मर्डसगांव येथील धक्या वरून अवैद्य रित्या साठवलेली हजारो ब्रास वाळू साठे प्रशासनाने जप्त केले खरे मात्र लिवावा पुर्वीच रात्रीच्या वेळी जेसीबी मशीन आणि ट्रक च्या साह्याने चोरून नेण्याचा डाव मरडसगाव ग्रामस्थांनी हानुन पाडत शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान टाळले.
मरडसगांव येथील रेती धक्यावरुन अवैध वाळू साठे अनेक ठिकाणी करण्यात आले यातील एका साठ्याचा दोन तीन दिवसा पुर्वी येथिल उपविभागिय कार्यालयात लिलाव झाला.अजून ही जप्त केलेले रेती साठे अनेक ठिकाणी असून रेती तस्कर रात्री तून यंत्रांच्या साह्याने हजारो ब्रास रेती उचलून नेत आहेत.बुधवार ६ सप्टेबर रोजी मरडसगांव शिवारातील अवैद्य रेती साठ्या वरून जेसीपी मशीनच्या साह्याने वाहने भरून जात असल्याची खबर ग्रामस्थांना लागताच त्यांनी वाळू साठ्याच्या ठिकाणी धाव घेत या वाहनांना वाळू नेण्यास मज्जाव केला. या वेळी महसूल प्रशासनाला या विषयी फोन वरून माहीती दिली मात्र दुपार पर्यंत मरडसगांव येथे अधिकारी पोहचले नव्हते असे ग्रामस्थांनी सांगितले या वेळी ग्रामस्थांनी एका जेसीबी मशीन सह ट्रक क्र एम एच ४५ टी ६८६३ हा ट्रक पकडला असून प्रशासन या दोन्ही वाहनां वर नेमकी कोणती कार्यवाही करणार या कडे लक्ष लागले आहे. लिलावा आधी रेती साठे उचलल्या जात आहे. यात नेमका प्रशासनातील कोणाचा वरदहस्त आहे.शासनाची मालमत्ता चोरून नेमका कोणता झारीतील शुक्राचार्य आपले झोळी भरत आहे. हे जनतेला समजण्या पलीकडचे असल्याचे ही बोलल्या जात आहे. या विषयी तहसीलदार शिंदे यांना विचारणा केली असता वाहने येत आहेत आल्या नंतर बघू अशी मोघम प्रतिक्रीया दिली

No comments:

Post a Comment