तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 11 September 2017

नोकाराने पळवले सव्वाकोटी रुपये, आयकर विभागाकडून मालकाची चौकशी.

_________________________

मालकाच्या सव्वा कोटीच्या रकमेवर नोकरानेच डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकणी नोकराला अटक करण्यात आली. यासीन अब्दुल शाहीद शेख असे अटक नोकराचे नाव आहे. त्याच्याकडून एवढ्या मोठ्या रकमेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही सव्वा कोटी रक्कम लकडवाला यांनीकोठून आणली? आणि ही रक्कम ते कोणाला देणार होते? याबाबत पोलिसांनी चौकश्ी सुरू केली. आयकर विभागही याबाबत चौकशी करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील परिसरात राहत असलेले व्यावसायिक जाफरअली लकडावाला (52) यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. डोंगरी परिसरातील पुना स्ट्रीटवरून गोव्याला जाण्यासाठी सुटणार्या भगवती ट्रॅव्हल्स या गाडीवर गोव्यातील एका नातेवाईकाला पाठविण्यासाठी लकडावाला यांनी शनिवारी सायंकाळी पार्सल दिले होते. पार्सलमध्ये डिनरसेट असल्याचे सांगून त्यांनीते पुढे पाठविले होते. त्याच दरम्यान शेखने ते पार्सल लकडवाला यांनी परत मागितल्याचे सांगितले. लकडवाला यांनी त्यात डिनरसेट असल्याचे सांगितल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीने त्या बॉक्सकडे अधिक लक्ष दिले नाही. त्यांच्या नोकराकडे बॉक्स दिला. त्याने तो लपवून ठेवला. बॉक्स गायब झाल्याचे लक्षात येताच लकडावाला यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डिनर सेटसह 3 लाख रुपये चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सर्वच नोकरांची चौकशी सुरू केली. त्यावेळी यासीनच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या. चौकशीअंती त्यानेच बॉक्स पळवल्याचे समजले. यासीनने पोलिसांना दिलेल्या माहितीत बॉक्स मध्ये 1 कोटी 22 लाख रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. लकडावाला यांनी या रकमेबाबत गुप्तता का पाळली? त्यांनी ही रक्कम कोठून व कशी आणली? ते हे पैसे कोणाला पाठविणार होते? याबात पोलिसांसह आयकर विभागही चौकशी करत आहेत.

No comments:

Post a Comment