Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

कै.रमेश वरपुडकर महाविदयालयात फुटबॉल स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथे महाराष्ट्र  फुटबाॕल मिशन   1 मिलियन  या कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबाॕल स्पर्धेला कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात खेळाडुंनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला  दि. 15 सप्टेबर रोजी सकाळी  11 वा.  स्पर्धेचे उदघाटन पत्रकार सुधीर बिंदू, पत्रकार गणेश पाटील, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्या शेख शकिला  शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.गोविंद वाकणकर, प्रा.डाॅ. बा.मु.काळे, प्रा.डाॅ.एम.डी.कच्छवे, प्रा.डाॅ. वनिता कुलकर्णी , प्रा.अंगद फाजगे ,प्रा.डाॅ.मुकूंदराज पाटील, प्रा.डाॅ. संतोष रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, सुरूवातीस खेळाबाबत फुटबाॕल प्रशिक्षक सय्यद शहबाज यांनी मार्गदर्शन केले. खेळाचे उद्घाटन करण्यापुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी.अधिकाधीक खेळाडू व नागरिक फुटबॉल खेळाकडे आकर्षित व्हावेत,  खेळाची आवड निर्माण होऊन विद्यार्थी व्यसनाकडे जाणार नाहीत व आरोग्यवान नागरीक निर्माण होतील हा उद्देश समोर ठेवून स्पर्धा आयोजित केली असल्याचे  प्रा.डाॅ. संतोष रणखांब यांनी स्पष्ट केले.
  स्पर्धेत  वर्गनिहाय मुला मुलींच्या एकुण 6  संघानी  सहभाग घेतला होता . यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात 12  विज्ञानने तर वरीष्ठ गटात बी. एस्सी प्रथम वर्षाच्या संघानी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
  विजेत्या संघातील खेळाडुंचे उपस्थितीत मान्यवरांमार्फत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा.महालिंग मेहत्रे प्रा.पंडीत राठोड प्रा.अंगद गायकवाड प्रा.जगदीश भोसले प्रा. जिवन भोसले प्रा. सतिश वाघमारे प्रा.विठ्ठल मुलगीर प्रा.संतोष वडकर प्रा.सुरेश मोरे प्रा.आरती बोबडे प्रा.ममता देवराये  दत्ता सोनटक्के चंद्रपाल पटके भागवत हाके यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment