तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

भाजप आमदार सरदार तारा सिंग यांची गाडी पोलीस चौकीत घुसली.

_________________________

मुंबईतील भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांच्या गाडीला गुरुवारी रात्री अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या त्यांच्या महिंद्रा एक्सयूव्ही गाडीने एका स्विफ्ट गाडीला आणि दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ही गाडी थेट ट्रॅफिक पोलीस चौकीला धडकली.ज्यावेळी अपघात झाला तेव्हा तारा सिंग यांचा चालक महेंद्र गुप्ती ही गाडी चालवत होता, तारा सिंह गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे. ही घटना नाहूर येथील सोनापूर सिग्नल जवळ घडली. ज्यावेळी गाडीने धडक दिली त्यावेळी पोलीस चौकीमध्ये हेड कॉन्स्टेबल उमेश ईशी होते. ते जखमी झाले आहेत. तरया गाडीचा चालक महेंद्र गुप्ता हादेखील जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघाता मध्ये रस्त्यावरील 2 कुत्रेही ठार झाले. तसंच पोलीस चौकी पूर्णतः कोसळली आहे. आता हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

No comments:

Post a Comment