तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

अवघ्या क्लिकवर बघा तुमचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे का ?

_________________________

केंद्र सरकारने नवी खाती उघडल्यानंतर आणि जुन्या बॅंक खातेदारांनीही केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांकाशी बॅंक खाते जोडणे बंधनकारक केले आहे. याबाबतचे नोटिफिकेशन 1 जून 2017 दिवशी देण्यात आले. या नोटिफिकेशन नुसार 31 डिसेंबर 2017 पर्यंत बॅंक खाते आणि बॅंक अकाऊंटजोडणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे बॅंक खाते ब्लॉक होण्याची शक्यता आहे. पण तुम्हांला तुमचे बॅंक खाते आणिआधार क्रमांक लिंक आहे की नाही ? हे घरबसल्या जाणून घेण्यासाठी हे पर्याय फायदेशीर ठरणार आहेत.

वेबसाईटवर कसे पहाल ?

www.uidai.gov.in वर लॉग ईन करा. आधार लिंकींकवर क्लिक करा. आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.  ही माहिती दिल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर बॅंक खाते आधार क्रमांकाशी लिंक केले आहे की नाही याची माहिती पाठवली जाईल.

मोबाईलवर कसे पहाल ?

तुमचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी लिंक केले आहे का ? हे जाणून घेण्यासाठी मोबाईलवरही सुविधा दिली आहे. * 99*99*1# हा क्रमांक डाईल करा. त्यानंतर आधार क्रमांक टाका. तुम्हांला आधार क्रमांक आणि बॅंक लिंक केलेले अअहे ही नाही याचे कन्फरमेशन मिळेल.या सुविधेमुळे तुम्ही शेवटी लिंक केलेल्या अकाऊंट खात्याची माहिती मिळेल. तुमची एकापेक्षा अधिक खाती असल्यास बॅंकेशी संपर्क करूनच माहिती घ्यावी लागेल.

No comments:

Post a Comment