तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Wednesday, 13 September 2017

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या परभणीच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंगोलीत महसूल कर्मचाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन.


मुंबई = जवाहरनगर गोरेगांव (प) परिसरातील मंदिरांवर महानगरपालिका दक्षिण विभागाची कारवाईस सुरुवात.

अयोध्या प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय रा.स्व. संघाला मान्य : मोहन भागवत

पुणे = डॉ. मेधा खोलेंवर कारवाईसाठी मोर्चा काढणार. 25 सप्टेंबरला खोलेंविरोधात विविध संघटनांचा मोर्चा. संभाजी ब्रिगेड, छावासह विविध संघटना घेणार सहभाग.


यवतमाळ जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा. शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग.


हरयाणा पोलिसांनी डेरा सच्चा सौदाचा आयटी हेड विनितला सिरसामधून केली अटक.


पुणे एनाकुलम एक्सप्रेस (22150) ही मंगळवारी सध्याकाळी पावणे सहा वाजता सुटणारी गाडी 14 सप्टेंबर ला मध्यरात्री 00. 25 वाजता सुटणार. एनाकुलम हुन येणारी गाडी उशिरा येत असल्याने वेळेत बदल.


सोलापूर = करमाळा शहरात मेन रोडवरील सराफाचे दुकान चोरटयांनी फोडलं. दीड किलो चांदी व तीन तोळे सोन्याचे दागिने केले लंपास.


मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांची समिती स्थापन. मुख्यमंत्र्यांकडून पाच सदस्यीय समितीची स्थापना. महसूल मंत्री चंद्रकात पाटील समितीचे अध्यक्ष. शिवसेने तर्फे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे सदस्य. भाजपा तर्फे गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर सदस्य.


प्रद्युम्न हत्या प्रकरण- कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. शाळेची सुरक्षा वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी.


भारत सरकारने विजय माल्ल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे लंडन मधील कोर्टाच्या ताब्यात दिली आहेत.


मुंबई = वांद्रे-कुर्ला संकुलातील 0.9 हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारची मान्यता.


सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेसचा विजय. शिवसेना भाजपाचा केला पराभव. काँग्रेस नगरसेवक राजूबेग आणि नगरसेविका संध्या तेरसे यांचा विजय.


मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना धमकी, मुख्य न्यायमूर्तींच्या दालनाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


कल्याण = दहागावात एसटीची स्कूलबसला धडक. सकाळी दहागाव आरोग्य केंद्राजवळ घडला अपघात. अपघातात स्कूलबस मधील 8 विद्यार्थी जखमी.जखमींवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु.

ब्रिटनमध्ये डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त.


सिंगभूम मध्ये सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन दोन नक्षलवाद्यांना ठार केले.

जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे दुपारी 3.30 वाजता अहमदाबादला पोहोचणार.


मुंबई = 20 वर्षीय तरूणीची नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या. काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद.


कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून पुढील सुनावणीस होणार सुरुवात.


जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर.

No comments:

Post a Comment