Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

कोरडवाहू शेती अभियान प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी


कार्तिक पाटील
डोंगरगावच्या शेतक-याची विभागिय आयुक्तां कडे तक्रार

पाथरी:- तालुक्यातील डोंगरगाव साठी शासनाच्या वतिने २०१४ साली कोरडवाहू शेती अभियान प्रकल्पा निवड करून या साठी ९७ लक्ष ७२ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला होता मात्र या निधित तत्कालीन कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याने याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी विभागिय आयुक्त औरंगाबाद यांच्या कडे निवेदना व्दारे नारायण फासाटे या शेतक-याने केली आहे.
२०१४ साली शासनाने कोरवाहू अभियान प्रकल्प राबवला होता त्यात पाथरी तालुक्यातील डोंगरगांवची निवड करण्यात आली होती हा प्रकल्प राबवण्याचा कालावधि एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ असा होता या साठी शासना कडून ९७ लाख ७२ हजार रुपये निधी देण्यात आला होता असे निवेदन कर्त्याने निवेदनात म्हटले आहे.या प्रकल्पाचा शेतकरी नारायण फासाटे यांनी मार्च २०१५ अखेर कृषी विभागाला खर्च मागितला असता मंडळ कृषी अधिकारी विभूते यांनी या प्रकल्पा साठी ४४ लक्ष १४ हजार रुपये निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली त्या पैकी ४३ लक्ष ७७ हजार रुपये या प्रकल्पा साठी खर्च झाल्याची माहिती दिली त्यात मनुष्यबळ विकासा साठी ३ लक्ष रुपयातून १ लक्ष ८६ हजार रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले प्रत्यक्षात हा खर्च १ लक्ष ४६ हजार एवढा अाहे. यात ४० हजाराचा अपहार आहे तर अजून १ लक्ष १४ हजाराचा फरक पडतो तसेच संरक्षित सिंचन सुविधे साठी २७.२८ लक्ष रुपये खर्च दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात १३ लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्याच बरोबर खरिप हंगामात सोयाबीन बियाणे रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरबरा, तुर पीक प्रात्यक्षिकां साठी ५ लक्ष ९९ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला परंतु गावात एकाही पिकाचे प्रात्यक्षिकच झाले नसल्याची गंभिर बाब ही या निवेदनात नमुद करण्यात आली आहे. तसेच माती परिक्षण केले नसतांना त्या साठी तीन लक्ष रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.या प्रकल्प अभियानात १८ लक्ष ८२ हजारांचा अपहार झाला असल्याने तत्कालीन कृषी अधिकारी बी आर काकडे यांच्या मनमानी आणि गैर कारभाराने हा प्रकल्प बंद पडला त्या मुळे या प्रकरणी योग्य ती न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी डोंगरगाव येथिल शेतकरी नारायण नानासाहेब फासाटे यांनी विभागिय आयुक्त आैरंगाबाद यांच्या कडे निवेदना व्दारे केली आहे.या पुर्वी फासाटे यांनी २१ डिसेंबर २०१५ रोजी फासाटे आणि ग्रामस्थांनी पाथरी तहसिल कार्यालया समोर उपोषण केले होते.तर ११ सप्टेबर २०१५ रोजी या विषयी परभणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन या झालेल्या भ्रष्टाचारा बाबत कृषी अधिकारी बी आर काकडे आणि त्यांच्या सहका-यांवर योग्यती कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते मात्र कार्यवाही होत नसल्याने या वेळी फासाटे यांनी थेट विभागिय आयुक्त मुख्यमंत्री आणि कृषी मंत्रयांचे दार ठोठावले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment