Breaking News
Loading...

Sunday, 17 September 2017

प्राणिशास्त्र विषयाच्या भित्तीपत्रकाचे विमोचन


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने विविध शैक्षणिक माहीतीच्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ह.शि.प्र.चे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, माजी मुख्याध्यापक प्रभाकरराव फपाळ, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते प्राचार्या शेख शकिला, संजय आडे, पत्रकार गणेश पाटील, महादेव मोटे व मान्यवरांची उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती संग्राम व विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्ताने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हशिप्रचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहनानंतर हिंदी व इतिहास विभागाच्या वतीने भित्तीपत्रकाचे प्रकाशन तसेच प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी संपादित केलेले जागतिकीकरण आणि भारत हे ग्रंथ ग्रंथालयास भेट दिले. तसेच भित्तीपत्रताचे प्रदर्शन आयोजित केले होते. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या बाबतीतील माहीती पत्रकाद्वारे उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सखाराम कदम व आभार प्रा अंगद फाजगे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. विकास रागोले, प्रा. संदिपकुमार देवराये, प्रा. विठ्ठल मुलगीर, प्रा. जगदिश भोसले, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. मारोती कच्छवे, ग्रंथपाल प्रा. सरकाळे, चंद्रपाल पटके, दत्ता सोनटक्के, पंजाब सुरवसे, बालासाहेब चोरमले, संतुक परळकर, बाबुराव फड, संतुक कुलकर्णी,  सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment