तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

ताेष्णीवाल महाविद्यालयात विद्यार्थी -शिक्षक-पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील ताेष्णीवाल कला,वाणिज्य महाविद्यालयात दि.०८ सप्टेंबर शुक्रवार राेजी विद्यार्थी -शिक्षक-पालक मेळावा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साेहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन हिंगाेली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन सेनगांव चे नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख,प्रमुख मार्गदर्शक संताेषजी अजमेरा (IIS)श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ऊत्तमराव शेळके,स्थानिक नियामक मंडळ,ताेष्णीवाल महाविद्यालय सेनगांव चे अध्यक्ष रमणजी ताेष्णीवाल,पं.स.सदस्य संताेष टेकाळे,सुभाषआप्पा एकशिंगे,आनंद अजमेरा,सुरेश अजमेरा,प्राचार्य वडगुले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री.गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कँम्पचे अध्यक्ष ब्रिजगाेपालजी ताेष्णीवाल आदी मान्यवंराची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु.माया एस्के आणि संच यांनी स्वागत गित सादर केले.कार्यक्रमाचे उदघाटक आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी शिक्षणाचे महत्व अधाेरेखीत करत काेनतेच क्षेत्र त्यापासुन दुर राहु शकत नाही.युवक व युवतींनी माेबाईल चा वापर मर्यादीत स्वरुपात करावा, आई-वडीलाप्रती असलेला आदर शिक्षणातुन वृध्दीगत व्हावा अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख यांनी सेनगांव सारख्या मागास परीसरात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानत विद्यार्थ्यांनी देखील शिक्षणाकडे काटेकाेर लक्ष द्यावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संताेषजी अजमेरा यांनी भारतीय माहीती सेवा या विषयी विस्तृत माहीती सांगितली. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत: न्यनगंड संपवावा ग्रामिण भागातच प्रतिकुल परीस्थीतीमुळे स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळु शकते हे बिहार व उत्तरप्रदेश मधील उत्तीर्ण हाेणा-या विद्यार्थ्यावरुन लक्षात येते.केंद्रीय लाेकसेवा आयाेग आयाेजीत परीक्षेत मराठवाड्यातील विद्यार्थी देखील यश संपादन करीत आहेत. याचा त्यांनी आवार्जुन उल्लेख केला. संस्थेचे सचिव ऊत्तमराव शेळके यांनी समायाेजीत काव्यात्मक शैलीत आपले मनाेगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विविध क्षेत्रात घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवंराच्या हस्ते पारीताेषीक,सन्मान चिन्ह व राेख रक्कमेचे बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बि.आर.ताेष्णीवाल यांनी अध्यक्षीय समाराेप करतांना असे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वागिंण विकासासाठी महाविद्यालय कटिबध्द असुन विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत स्वत:ला झाेकुन यश संपादन करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.एस.आर.पजई, प्रा.राजेश जाेशी, प्रा.आर.एस.सबनिस तर आभार प्रदर्शन प्रा.एस.बी.फड यांनी केले. पालक मेळाव्यासाठी पालकांचा सहभाग उल्लेखनीय असा हाेता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment