तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Tuesday, 12 September 2017

सर्वसामान्य जनतेसारखे नितेश राणे एकटे कधी फिरणार: - वैभव नाईक

कणकवली, दि. 12 - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. अशा प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञावर एकतर्फी टीका करून आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गची मान खाली घातली आहे. असे सांगतानाच वयोवृद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना एकटे कधी फिरणार, असा सवाल विचारणारे आमदार राणे स्वतः सर्वसामान्य जनतेसारखे एकटे कधी फिरणार आहेत? असा उपरोधिक सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.

कणकवली येथील विजय भवनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयेंद्र रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते..यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गात कोणाची भीती आहे? काळ्या सफारीवाले आणि शिट्टीवाल्यांच्या गराड्यात ते का फिरत आहेत ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याच्या तारुण्याच्या काळात सर्व गड, किल्ले एकट्याने पादाक्रांत केले आहेत.तसेच त्यांचा इतिहास जनतेसमोर मांडला आहे. त्यामुळे अशा थोर व्यक्तीवर टीका करणे चूक आहे.

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत सांगत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचा फायदा घ्यायचा, मते मिळवायची आणि काँग्रेसच्या बैठकीलाच विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका का घेतली जात आहे..थोड्याच दिवसात सिंधुदुर्गातील काँग्रेस भाजपामध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जनता शिवसेनेलाच स्वीकारणार आहे. भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढेल असे जाहीर करतानाच एखाद्या गावात गाव पॅनेल असेल तर जनमताचा आदर करीत शिवसेना त्यांच्यासोबत राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

आमदार नाईक पुढे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी मोठा निधी आणला आहे. जिल्ह्यातील मटका, दारू अशा अवैध धद्यांवर पालकमंत्र्यांच्या आदेशावरूनच पोलीस कडक कारवाई करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांचे जिल्ह्यात चांगले काम चालले आहे.

यापूर्वी नारायण राणेसुद्धा जिल्ह्यात सिने-कलाकारांना आणायचे, त्यावेळी आता टीका करणारे त्यांच्यावर का टीका करीत नव्हते ?, याचे त्यांनी उत्तर द्यावे. आमची 'ईडी' ची चौकशी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. ज्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे ते भाजपच्या वाटेवर आहेत, असा टोलाही आमदार नाईक यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

राणेंचा भाजप प्रवेश कार्यकर्त्यांसाठी नाही!

मराठा मोर्चानंतर राणेंकडे मराठा समाजाने नेतृत्व दिले. त्याचा वापर ते आपल्या स्वार्थासाठी करीत आहेत. नारायण राणेचा भाजपा प्रवेश कार्यकर्त्यांसाठी नसून त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सतीश सावंत अथवा आणखी कोणा कार्यकर्त्यांना आमदार करण्यासाठी तर हा प्रवेश निश्चितच नाही, असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले...

No comments:

Post a Comment