Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

शेतक-याच्या तरूण मुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या


प्रा.डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स
सोनपेठ  : तालुक्यातील वंदन येथील शेतक-याच्या तरूण मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटणा बुधवार 13 सप्टेंबर रोजी राञी 8:30 च्या सुमारास घडली.
वंदन येथील प्रल्हाद कलिंदर यांची वंदन शिवारात जमीन आसुन त्यांच्यावर वडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व सोनपेठ येथील इंडिया बँकेचे कर्ज होते, यांना दोन मुले होती यापैकी त्याच्या मोठ्या मुलाने नागनाथ कलिंदर वय 23 वर्षे याने बुधवारी राञी साडेआठच्या सुमारास परळी-गंगाखेड या रेल्वेलाईनवर निळा-करम च्या शिवारात रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.
पहाटे तिन वाजता नागनाथचे प्रेत सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवविच्छदनासाठी आनन्यात आले होते.
पण येथे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे या प्रेताचे शेवविच्छदन दुपारी 12 वाजता झाले.
तालुक्यात याआगोदर शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या होत्या पण शेतक-याच्या तरूण मुलाने आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.
तरी याबाबत सोनपेठ पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आसुन याबाबत पुढील तपास सहाय्यक उपनिरिक्षक घोबाळे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment