तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

आर्ट आॅफ लिविंग तर्फे भोकरदन शहरात स्वच्छता मोहीम

मधूकर सहाने
भोकरदन:- येथे आर्ट आॅफ लिविंग तर्फ सोमवारी सकाळी १० वाजेपासुन भोकरदन शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवुन झाडुने कचरा जमा करून घंटा गाडीत जमा करण्यात आला.
   भोकरदन शहरातील पोलिस स्टेशन ,नगरपिलिका,कोर्ट,बस स्थानक,जालना रोड,ग्रामिण रूण्णालय परिसरात आर्ट आॅफ लिविंगच्या परिवाराने सहभाग घेऊन हातात झाडु घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.यावेळी  डाॅ. अजय देशमुख  ( वैद्यकीय  आधिकारी. ग्रामीण रुग्णालय भोकरदन) सौ. शोभाताई मतकर,श्री राजु देशमुख, श्री. शेषराव(मामा)तळेकर ,अजय मतकर ,गणेश पडोळ,दिपक आगलावे,शिवाजी इंगळे,सतिष रोकडे,अजय मतकर, वैभव जाधव,सह शंभर ते दिडशे आर्ट आॅफ लिविंगच्या परिवाराने सहभाग नोदवला.

No comments:

Post a Comment