तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

सोनपेठला ज्ञानपेठ बनवण्याचा ध्यास घेतलेला हाडाचा शिक्षक : शौकत पठाण


प्रा.डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठः  तालुक्याला ज्ञानपेठ बनवण्याचा ध्यास घेऊन कार्य करणारे गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी अनेक उपक्रम राबवत शिक्षकांचे मनोबल उंचावले व ज्ञानरचनावाद, ई - लर्निंग इत्यादीसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी आज चक्क चार तास शिक्षकांचा खडू व फळ्याचा वापर करत तासच घेतला.
शिक्षक पायाभुत चाचणीतील प्रगत मुल कसे ठरवावे यात गोंधळलेले असल्याचे लक्षात येताच मुलभुत क्षमता व प्रश्नपञीकेतील प्रश्न याचा सबंध शोधताना संभ्रमावस्थेत आहेत असे सोनपेठ येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः तालुक्यातील सर्व शिक्षकासाठी हातात खडु घेतला,व पायाभूत चाचणीतुन प्रगत विद्यार्थी कसे ठरवावे यासंदर्भात स्वतः तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेतली सतत चार तास
"खडु-फळा"यांच्या साहाय्याने त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्यातील एक आदर्श शिक्षक सर्व शिक्षकांना अनुभवयास मिळाला व त्यामुळे शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.
गटशिक्षणाधिकारी पठाण यांनी सलग चार तास शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत सुरू आसलेल्या पायाभूत चाचणी बाबत प्रगत विद्यार्थी कसे ठरवावेत,भाषा व गणिताचे मुलभुत क्षमतेचे प्रश्न कोनते? तसेच चाचणी नंतर अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी   काय उपचारात्मक उपाययोजना कराव्यात याविषयी सखोल कृतीयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणातील त्यांचा आटापिटा हा शिक्षकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.

No comments:

Post a Comment