तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

स्वस्त धान्य दुकानात मिळणार गॅस सिलेंडर

मुंबई - आता स्वस्त धान्य दुकानांमधून पाच किलोचे गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय खुल्या बाजारात रॉकेलची विक्री करण्यासही शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

शिधापत्रिकेवर वाटपासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला रॉकेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने रॉकेलच्या अनुदानात कपात केली आहे. तसेच राज्य सरकारला मंजूर करण्यात येणाऱ्या दर महिन्यांच्या कोट्यातही कपात करण्यात आली आहे. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांना राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दरमहा होणारा पुरवठा कमी झाला आहे.

स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त अन्य कामांसाठी रॉकेलचा वापर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनुदानित रॉकेलवरील ताण कमी करण्यासाठी आणि वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी खुल्य बाजारात रॉकेलची विक्री करण्यास स्वस्त धान्य दुकानदारांना परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. त्यानुसार या दुकानदारांना रॉकेल आणि सिलिंडरची विक्री करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात रॉकेलसह पाच किलो वजनाचे सिलिंडरची विक्री करणे या दुकानदारांना आता शक्‍य होणार आहे. यासाठी काही घाऊक पुरवठादार म्हणजेच एसकेओ एजंट्‌स यांनी रेशन दुकानदारांना या वस्तु पुरविण्याची तयारी दर्शविली. ऑइल कंपन्यांकडून निश्‍चित करण्यात आलेल्या निकष व मार्गदर्शक सूचना पूर्ण करणाऱ्यांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment