तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

मराठवाडा मुक्ती मोर्चा  जिंतुर तालुका अध्यक्ष एकनाथ आवचार यांची निवड

जिंतुर
जिंतुर तालुका येथील  सा. बा .वि .शासकीय विश्राम गृह जिंतुर येथे दिनांक 16 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती मोर्चा ची  संस्थापकाच्या उपस्थित बैठक घेण्यात आली आहे , या बैठकीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री सचिन रायपत्रीवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मुक्ती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष श्री बाबा उगले यांच्या  अध्यक्षतेखाली  या बैठकीचे आयोजन करण्यात आले होत जिंतुर  तालुक्यातील चारठाणा येथील एकनाथ आवचार यांची मराठवाडा मुक्ती मोर्चा च्या जिंतूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

         आवचार यांचे कार्य सर्व सामाजिक व राजकीय यांची मराठवाड्यासाठी तळमळ, सर्व गरजूंना मदत करतात ,सर्व कामात अग्रेसर असतात ,एक चळवळीचे  नेतृत्व आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून,यांच्या कार्याची दखल घेऊन या संस्थापकांने मराठवाडा मुक्ती मोर्चा च्या जिंतुर तालुका अध्यक्ष म्हणून एकनाथ आवचार चारठाणा याची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

        या वेळी संस्थापक अध्यक्ष बाबा उगले यांनी बोलताना सांगितले की, आपल्या मराठवाडा मुक्ती मोर्चा या संघटनेचे ध्येय धोरण असे आहे की ,आपला मराठवाडा च्या भाग महाराष्ट्रा पासून वेगळे करून मराठवाडा राज्य घोषित करण्यात यावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, मागासलेल्या मराठवाड्या चा सर्वांगीण विकास होण्यासाठी मराठवाडा राज्य झालेच पाहिजे हे सर्व मराठवाडा वाशियाना पटवून देण्यात साठी आपण कुठेही कमी पडणार नाहीत ,देश स्वतंत्र झाला आहे तसा आपला मराठवाडा राज्य झालेच पाहिजे हे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन बाबा उगले यांनी या निवडी प्रसंगी व्यक्त केले आहे.

         जिंतुर येथील शासकीय विश्राम गृहात एकनाथ आवचार  चारठाणा यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे ,त्या वेळी संस्थापक अध्यक्ष बाबा उगले, सचिन रायपत्रीवार, रमेश राठोड, रोहित देशपांडे, मारोती लोमटे, सर्व संघटनांचे पदा अधिकारी व सर्व पत्रकार मंडळी व गावकरी उपस्थित होते

        या सर्वांनी याचे निवडीचे हार्दिक स्वागत केले आहे व चारठाणा येथे आवचार याचे दणदणीत स्वागत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment