तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

खंडाळा प्रशालेत स्वंयशासन दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी / खंडाळा
वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक दिना निमित्त स्वंयशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचे घटक शिक्षक कशा पद्धतीने शिकतात याचे प्रात्यक्षीक स्वत: अनुभव घेतला. 
या प्रसंगी शिक्षक दिनाच्या दिनी मुख्याध्यापक पदी नवनाथ बहाळस्कर तर परवेक्षक पदि निलेश अविनाश पवार, शुभम वेळंजकर, शुभम शिंदे, निलेश पवार, केशव पवार, कृष्णा थोरात, असरालन शेख,विशाल दाभाडे, तेजिला शेख, आयशा शेख यांनी आध्यपनाचे कार्य केले. शिपाई म्हणून प्रथमेश आयुष्यपाल,संतोष बागुल हे होते या वेळी वकृत्व स्पर्धा घेवुन गुरु पुजन करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक ई बी गवळी, आर एच नवले, अशोक दारवंटे,एस ए बर्डे, ई के खेडकर, बी टी वानखेड़े, भगवान दारवंटे, बि आर कहांडाळ, व्ही एन पठारे, व्ही एस पवार, के एस गवारे, एम डी कुमावत, आर एस भुजबळ, व्ही ओ सोनार, एस के करे आदि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पवार, महेश जाधव, कल्याण पवार यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment