Breaking News
Loading...

Sunday, 10 September 2017

गंगापूर साखर कारखान्याची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय


गंगापूर - गंगापूर सहकारी साखर कारखान्याची नव्याने उभारणी करून सुरू करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सभासदांच्या सभेत घेण्यात आला. शेती महामंडळाची जमीन कराराने घेण्याचाही प्रस्ताव या सभेपुढे मांडण्यात आला. आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. गंगापूर सहकारी साखर कारखाना बँकेकडून संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात आली होती. यासाठी वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या एका गटाने हा कारखाना सुरू करण्यासाठी अभ्यास केला. जुन्या स्थितीत कारखाना आणि डिस्टलरी प्लँट सुरू करणे, कारखान्याची अर्धी मशिनरी बदलून चालू करणे आणि संपूर्ण कारखाना नव्याने उभारून सुरू करणे असे तीन पर्याय या अभ्यास गटाने संचालक मंडळासमोर ठेवले होते.
    अभ्यास गटाने दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी शनिवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी कारखान्याचे संचालक, सभासद आवर्जुन उपस्थिती होते. आवाजी मतदानांने सर्वानुमते नवीन कारखाना उभारून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभासदांकडील अपूर्ण रक्कम वसुल करणे आणि नवीन सभासद नोंदणी करणे याबाबत या सभेत चर्चा झाली, अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी.एम. पाटील यांनी दिली.
    यावेळी चेअरमन  प्रशांत बंब, व्हाईस चेअरमन लक्ष्मण भुसारे, माजी आमदार अण्णासाहेब माने, कैलास पाटील, कृष्णा पाटील डोणगावकर,नंदकुमार गांधीले , रामेश्वर मुंदडा , देविदास वाघ,शिवाजी शिन्दे , दिलीप बनकर , डाँ गोरख तुपलोडे ,राजेद्र वाबळे ,, रज्जक पठाण ,कृष्णाकांत व्यवहारे ,नगरसेवक  आदींसह कारखानाचे संचालक, सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

No comments:

Post a Comment