Breaking News
Loading...

Saturday, 16 September 2017

सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी.

_________________________

सप्तश्रृंगी गडावर तुम्हाला बोकडाचा बळी द्यायचा असेल, तर यापुढे ते करता येणार नाही. कारण, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या बोकडबळी प्रथेला फाटा देत ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. या मोठ्या निर्णयाचं अनेक स्तरावरुन स्वागतही होत आहेत.  गेल्या वर्षी एका दुर्घटनेत गडावरचे 12 भाविक जखमी झाले होते, त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला. बोकडबळी प्रथेनंतर मानवंदना देण्याची प्रथा आहे. त्यात हवेत केलेल्या गोळीबारात गडावरचे 12 भाविक जखमी झाले होते. त्यामुळे ही प्रथाच बंद करण्याच निर्णय घेतला गेला. सप्तश्रृंगी मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकड बळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. पण मंदिर परिसरात बंदी कायम राहील. काही दिवसांपूर्वी तुळजापुरातही मांसाहारी नैवेद्यावर बंदी आणली गेली. मात्र, नंतर काही तासात मंदिर प्रशासनानं हा निर्णय मागे घेतला. मात्र, सप्तश्रृंगी मंदिर प्रशासन घेतलेल्या या निर्णयावर ठाम राहणार असल्याची माहिती आहे.

No comments:

Post a Comment