Breaking News
Loading...

Friday, 8 September 2017

तळणी येथिल निराधार,अंपगाच्या उपोषणास पँथर सेनेचा पाठींबा...

सेनगाव:- तालुक्यातील तळणी येथिल असंख्य नागरीकांनी ०६ सष्टेबर रोजी तहसिलदार वैशाली पाटिल यांना निवेदन अर्ज देवुन कळविले की गतवर्षी  जांभरुन (ब्रुं) सज्जा तळणी गावचे तलाठी यांनी संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,इदिरा गांधी राष्ट्रिय विधवा,अंपग,वुध्दापकाळ निवृत्ती वेतन योजने बाबत गावातील बोगस लाभार्थीची माहीती घेवुन तपासणी अहवाल सादर केल्या कारणाने गावातील असंख्य अंपग,विधवा,वयोवुंध्द महिला पुरुषाचे वेतन बंद झाल्याने कळविले आहे याबाबत माहीतीचा अधिकार अधिनीयमान्वे माहीती घेतली आसता यामध्ये असंख्य पात्र लाभार्थाना या योजननेचा लाभ मिळत नसल्याने त्रस्त आसलेल्या अंपग, विधवा,वयोवुंध्द जनतेच्या वतीने तहसिल कार्यालय सेनगाव समोर १४ सष्टेबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आसुन या उपोषणास पँथर सेना सामाजिक संघटनेच्या वतीने पाठींबा देत तळणी गावातील अंपग,विधवा,वयोवृंध्द नागरीकांच्या वेतन पुर्वीप्रमाणे चालु करावे व गावातील तपासणी अहवालावरील पंच यांच्यासह लोकसेवकांने चुकीचा,दिशाभुल करणारा तपासणी अहवाल सादर केल्याने सबंधीत लोकसेवक,पंच यांच्यावर कार्यवाहीची मागणी निवेदनात करुन नागरीकांना पाठींबा देत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर सेनगाव तालुका प्रमुख विनोद खंदारे यांची स्वाक्षरी आसुन आपण न्याय मिळेपर्यत लढा देणार  आसल्याची माहीती तेजन्युज हेडलाईन्स चे प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख सेनगांवकर यांच्याशी बाेलतांनी सागितले.

No comments:

Post a Comment