तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : जर तुम्ही पदवीधर आहात आणि बँकेत नोकरीचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने क्लार्क पदाच्या परीक्षेसाठी नोटिफिकेशन जाहीर केलेय. विविध बँकामध्ये क्लार्क पदासाठी तब्बल ७८३३ पदांची भर्ती केली जाणार आहे. 
अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. उमेदवार १२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. 
पदाचे नाव - क्लार्क
एकूण पदांची संख्या - ७८३३
पात्रता - पदवीधर
ठिकाण - ऑल इंडिया
अर्ज करण्यासाठीचा वेळ - १२ सप्टेंबर २०१७ ते ३ ऑक्टोबर २०१७
वयोमर्यादा - २० ते २८ वर्ष
उमेदवार  नेटबँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही फी भरु शकता. 
जनरल श्रेणीच्या उमेदवारांसाठी ६०० रुपये परीक्षा फी तर आरक्षित श्रेणीसाठी १०० रुपये फी आहे. 

No comments:

Post a Comment