तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

चीनमध्ये धावणार विजेवर चालणाऱ्या गाड्या, पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांवर घातली बंदी.


_________________________

वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी ऑटो मार्केट असेलेल्या चीन मध्ये याविषयी वाहन तयार करणाऱ्या कंपनीला डेडलाइन दिली आहे. यामध्ये त्यांनी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचीविक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. विजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्यास सुरुवात करा असाही आदेश देण्यात आला आहे. चीनपूर्वी ब्रिटन आणि फ्रांसमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार वायु प्रदूषण रोखण्यासाठी ब्रिटेन मध्ये 2040 नंतर फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या विकल्या जातील. इंधन-ज्वलनामुळे नायट्रोजन व सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड, हायड्रोकार्बन हे रासायनिक प्रदूषक वाढत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर चिनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्री अँड इन्फर्मेशन टेक्नॉलजीचे मंत्रीशिन गुओबीन यांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेल वाहानांचे उत्पादन आणि विक्री रोखण्यासाठी सरकार काम करत आहे. यावर लवकरच उपाययोजना काढू. या निर्णयामुळे पर्यावरण आणि चीनच्या ऑटो मार्केटवर मोठा परिणाम होणार आहे.विजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. कडक नियम केल्यास पेट्रोल-डिझेल गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा बसेल. 2030 पर्यंत चीन सरकार सर्वच पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांलर बंदी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शिन यांनी सांगितले.

कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल, गडकरींचा कार उत्पादकांना इशारा .

पर्यावरण प्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या बनवा अन्यथा, कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल त्यास तयार रहा असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वेहिकल्सवर लवकरच सरकार धोरण आखणार असून सध्या या विषयावरील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सूचित केले. भविष्य पेट्रोल व डिझेलच्या गाड्यांचे नसून पर्यायी ऊर्जेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी आधी तुम्हाला नम्रपणे संशोधन करण्यास सांगितले. प्रथम ज्यावेळी मी बोललो, त्यावेळी तुम्ही म्हणालात बॅटरी खूप महाग पडते. आता बॅटरीची किंमत 40 टक्क्यांनी घसरली आहे. आणि तुम्ही आता उत्पादनाच्या दृष्टीने सुरूवाती कराल तर या किमती आणखी कमी होतील, असे ते म्हणाले. कार, बसेस, टॅक्सी अथवा मोटरसायकल काही असो भविष्य हे वीजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment