तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

भोकरदन येथे  वन मिलियन फूटबॉल स्पर्धेचे आमदार संतोष  दानवे यांच्या हस्ते उद्घाटन !

    प्रतिनिधी : भोकरदन

येथील  मोरेश्वर काॅलेजच्या प्रांगणात जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तीय शालेय वन मिलियन फूटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 15 सप्टेंबर शुक्रवार रोजी  आमदार संतोष दानवे यांच्या  हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  उपविभागिय अधिकारी हरिचंन्द्र गवळी तहसिलदार  श्रीमती योगीता कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, पोलिस निरिक्षक दशरथ चौधरी ,नगर परिषदेचे मुख्याधिकरी अविनाश सोंगटे , गट शिक्षण विस्तार अधिकारी उमेश जैन , पंचायत समिती सभापती विलास आडगावकर   केंदप्रमूख. श्री.आर एच . सोनवणे .क्रीडा संयोजक प्रा .ए जी, नवगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती , दरम्यान तालुकास्तीय शालेय वन मिलियन फूटबॉल स्पर्धेत तालुक्यातिल काॅलेज , महाविद्यालय , शासकीय निमशासकीय शाळेतील जवळपास 1600 खेळाडू सहभागी झाले होते अशी माहिती .क्रीडा संयोजक प्रा .ए जी, नवगिरे यांनी दिली . भोकरदन येथील गणपती विद्यालय, शिवाजी विद्यालय, भोकरदन . कस्तुरबा बालिका  विद्यालय, भोकरदन. मराठवाडा . न्यू हायस्कूल सह तालुक्यातिल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी 
क्रीडा मार्गदर्शक. किरण साळवे . नितिन बोर्डे . कार्यक्रमाचे सुञसंचालन महेंद्र लोखंडे, यांनी केले तर  तालुका क्रीडा संयोजक प्रा.ए . जी. नवगिरे यांनी  केले.

   छाया : मधुकर सहाने

No comments:

Post a Comment