Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

'काँग्रेसच्या बैठकीत राणेंना का बोलावण्यात आलं नाही?'


सिंधुदुर्गात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झाला.सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झाला.या बैठकीला नारायण राणे यांना का बोलावण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित करत नितेश राणे आक्रमक झाले. अशोक चव्हाण घाणेरडे राजकारण करतायत असं म्हणत नितेश आणि राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.ही बैठक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी बोलावली होती आणि या बैठकीला हुसेन दलवाई उपस्थित होते. तत्पूर्वी कणकवलीमध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसची पहिली बैठक घेतली. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या असताना आपणच सिंधुदुर्ग काँग्रेसचे नेते असल्याचा दावा राणेंनी यावेळी केलाय. जिल्हाध्यक्षांनी घेतलेली बैठक अधिकृत असल्याचं सांगत हुसेन दलवाई कोण आणि त्यांचा सिंधुदुर्गशी संबंध काय? असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय.  

No comments:

Post a Comment