तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

गेवराई येथील इंदिरा गांधी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि 7 __ येथील माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
   या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. भारती बांगर ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासक नूर पठाण सर हे उपस्थित होतेे. व्यासपिठावर पर्यवेक्षक राहुल पाठक यांची ही उपस्थिती होती. यावेळी सर्व शिक्षकांचा विद्यार्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कु.शैलेश वाघमारे, कु.अतुल टकले या विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षिय समारोपात प्राचार्या सौ.भारती बांगर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, शिस्त हि जीवणाला वळण देते तसेच ईश्वर हा प्रत्येक व्यक्तीला भेटू शकत नाही म्हणून ईश्वराने माता-पिता व शिक्षकांना घडवले असे सांगून त्यांनी मुलांना शिक्षक दिनाचे महत्व पटवून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक नूर पठाण सर यांनी केले.
     यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राधिका चव्हाण हिने तर आभार गणेश तेलुरे याने मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment