तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना पहिला वर्धापन दिन व दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 8 September 2017

जिंतूरातील अवैध ऑनलाईन लॉटरी बंद करण्याची मागणी
जिंतूर:- शहरात मागील काही दिवसांपासून अवैद्य ऑनलाइन लॉटरीने धुमाकूळ घातला असल्याने तरुण वर्गासह विद्यार्थी याचा आहारी जात आहे म्हणून शहरातील चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे 7 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा वतीने करण्यात आली आहे..
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तालुका हा शेतकरी बहुलभाग आहे, त्यात शेतकरी निसर्गाचा अवकृपेमुळे आधीच अडचणीत असून तरुणाई बेरोजगारीचा सामना करत आहे.त्यातच शहरात सर्वत्र अवैध ऑनलाईन लॉटरीने थैमान माजवले आहे.तरुण व विद्यार्थी वर्ग ह्याच्या आहारी जाऊन कर्जबाजारी होत आहे शहराचा मुख्य रस्त्यावरच बसस्थानक,छत्रपती  शिवाजी महाराज चौक, मोंढा,बामणी प्लॉट,जिल्हापरिषद मैदान,बालसा रोड, सह इतर अनेक ठिकाणी ही अवैध लॉटरी पोलिसांच्या अर्थपूर्ण पाठींब्यावर बिनबोभाट चालू आहे.तरुणांची होणारी ही परवड थांवबविण्यासाठी हे अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.हे जुगाराचे धंदे त्वरित बंद न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रदेश सचिव अक्षय पाटील ह्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे..

No comments:

Post a Comment