तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

मकाेडी येथील जि.प. प्रा.शाळेत स्वयंशासन दिन साजरा

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील मकाेडी येथील जि.प. प्रा.शाळेत ५ सप्टेंबर राेजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन वर्ग ८ वीच्या विद्यार्थीनींनी स्वयंशासन दिन साजरा केला.
शाळेतील वर्ग ८ वीच्या विद्यार्थीनींनी वर्ग १ ली ते ७ वी पर्यंत सर्व शाळेचे व्यवस्थापन व विषयवार तासिका घेतल्या इंग्रजी,मराठी,ग
हिंदी,गणित,शारीरीक शिक्षण,चित्रकला,कार्यानुभव आदी विषयी च्या तासिका उत्तमरितीने घेऊन एक दिवस शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मुख्याध्यापक म्हणुन आकाश कांबळे याने काम पाहीले. शिक्षक म्हणुन वैष्णवी घुगे,वैशाली दराडे,रेणुका खरात,ज्याेती माेरे,अर्चना गायकवाड,सुमय्या शेख,मुस्कान शेख,पुजा चव्हाण,मिरा टिकनाेर,दुर्गा फुपाटे आदी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment