Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

शुक्रवारी चार ग्रह सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एकत्रितपणे सिंह राशीमध्ये आहेत. यांच्यावर वृश्चिक राशीतील शनीची वक्रदृष्टी आहे. यामुळे बहुतांश लोकांना नुकसानाऐवजी फायदा होऊ शकतो. 12 पैकी 4 राशीच्या लोकांनी संभाळून राहावे. इतर 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शुक्रवारच्या ग्रह-स्थितीमुळे अनेक लोकांची अपूर्ण कामे पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष - आर्थिक नियोजन बिघडेल. दैनंदीन कामात काही अडथळे येतील. महिलांना आज परि़़श्रमांतून यशप्राप्ती. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तास वाढवावेत. शुभ रंग : राखाडी, अंक-८.

वृषभ - बऱ्याच दिवसापासूनची रखडलेली कामे पूर्ण होतील. अडचणी नियंत्रणात राहतील. आवक ठिकठाक राहील. विद्यार्थ्यांचे प्रयत्नांचे चीज होईल. शुभ रंग : पिवळा, अंक-७.

मिथुन - एखाद्या सामाज हिताच्या कार्यातील तुमचा सहभाग इतरांस प्रेरणा देईल. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही उत्साही व आशावादी असाल. शुभ रंग : भगवा, अंक-९.

कर्क - आज परदेशाशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील. उच्चशिक्षित मंडळींना विदेशातील नोकरीच्या संधी येतील. गृहीणींना काटासर करावी लागेल. शुभ रंग : डाळिंबी, अंक-२.

सिंह - समोरची व्यक्ती तुमच्या प्रभवात राहील. प्रामाणिक मेहनत व सकारात्मकतेने अशक्य कामेही शक्य होतील. विवाह विषयक बोलणी यशस्वी होतील. शुभ रंग:केशरी, अंक-६.

कन्या - व्यावसाियकांच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढतील. नोकरदारांना अिधकारप्राप्ती होईल. ऐनवेळी एखाद्या मित्राच्या मदतीस धावून जावे लागू शकते. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.

तूळ - आक्रमकपणास आवर घालून थोडे तडजोडीचे धोरण स्विकारलेत तर उद्योग व्यवसायातील उद्धिष्टे सहज गाठता येतील. तरूणांनी मर्यादेत रहावे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-५.

वृश्चिक - व्यवसायात मोठया उलाढाली वेग घेतील. आज विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील. संध्याकाळी प्रियजनांच्या गाठीभेटीत वेळेचे भान रहाणार नाही. शुभ रंग : नारिंगी, अंक-१.

धनू - आज कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. नवीन ओळखीत व्यवहार टाळाच. दानधर्म, परोपकार वगैरे उद्यावर ढकला. आज पत्नीचे ऐकाल तर फायद्यात रहाल. शुभ रंग : पिस्ता, अंक-४.

मकर - मोठया लोकांच्या ओळखीतून फक्त आपला स्वार्थ साधून घेतलेला बरा. इतरांना सल्लेवाटप नको. वैवाहीक जिवनांतले मतभेद सामंजस्याने मिटवता येतील. शुभ रंग :पांढरा, अंक-९

कुंभ - दिवस अनुकूल असल्याने महत्वाची कामे उरकूनच टाका. प्रकृती साथ देईल. प्रिय व्यक्तिचा अनपेक्षितपणे फोन येईल. घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. शुभ रंग : निळा, अंक-३.

मीन - कौटुंबिक खर्च जरी वाढता असला तरीही आवश्यक गरजा सहजपणे भागणार आहेत. आज विद्यार्थी अभ्यासास प्राधान्य देतील. तुमचा कार्यउत्साह वाढेल. शुभ रंग : मोतिया, अंक-३.

No comments:

Post a Comment