तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 15 September 2017

राष्ट्रीय ऐक्य वाढविणारी हिंदी भाषा - प्राचार्या डॉ.कांचन परळीकर

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. 15  __ प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी किंबहुना काळाची गरज म्हणून इतर भाषेसोबतच आपण हिंदी भाषेला देखिल तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. हिंदी भाषा ही राष्ट्रीय ऐक्य वाढविणारी असल्याचे प्रतिपादन महिला महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर यांनी केले.
           जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतिने गुरुवार, दि. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी विभागप्रमुख, प्रसिद्ध नाटककार प्रा. बापू घोक्षे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर ह्या होत्या. सर्वप्रथम कु. जया थोरात व कु. पूजा राउत यांनी तयार केलेल्या 'उडान' या भित्ती पञकाचे विमोचन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा. बापू घोक्षे म्हणाले की, हिंदी भाषेचे महत्व दिवसेन-दिवस वाढत चालले आहे. भारतीय राज्यघटनेने हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. त्या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय कार्यालयां मधून हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर "हिंदी दिवस‘ म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या प्रमुख पाहुण्या महाविद्यायाच्या माजी विद्यार्थिंनी सौ. शिवगण रागिणी यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व पटवुन सागितले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, राष्ट्रीय एकात्मता वाढविण्याचे काम हिंदी भाषा करत आहे. हिंदी भाषा दिवस हा शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयां मध्ये आणि इतर संस्थामध्ये याच दिवसी एक उपक्रम म्हणुन साजरा केला जातो. यादिवशी हिंदी कविता, कथा, प्रश्न मंजुषा इत्यादींचे समायोजन केले जाते.  प्रत्येकाचा कल इंग्रजी भाषा बोलण्याकडे आणि शिकण्याकडे जास्त आहे. प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी किंबहुना ती काळाची गरज म्हणून इंग्रजी भाषेसोबतच आपण हिंदी भाषेला तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक भाषेचे सखोल ज्ञान असणे ही आता काळाची गरज आहे. देशाची भाषा आणि संस्कृती त्या देशातील लोकांच्या संपर्कासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात हिंदी विभागाच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. संगीता आहेर म्हणाल्या की, संपूर्ण भारतात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने हिंदी भाषेला आपली मातृभाषा बनवण्याचे ध्येय हाती घेतले होते असे सांगितले.
        या कार्यक्रमाचे सुञसंचालन हिंदी विभागाचे प्रा. डाॅ. संतोषकुमार यशवंतकर यांनी केले. या प्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment