तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांच्या कार्यालयांवर एसीबीच्या धाडी

गोवा:-विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी पथकाने उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिकच्या संपत्तीप्रकरणी एफआयआर दाखल केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथक कवळेकर यांच्या मडगाव येथील व्यावसायिक आणि आमदार कार्यालयांवर आणि बेतुल येथील निवासस्थानावर छापे टाकले असून या प्रकरणाशी संबंधीत दस्ताऐवज मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती एसीबीचे पोलिस अधीक्षक बोस्को जॉर्ज यांनी दिली.कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर ही बाबू कवळेकर यांच्या कंपन्यांची संचालक असल्याने तिच्या विरोधात देखील एफआयआर नोंदवण्यात आल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.

कवळेकर यांचे उत्पन्न आणि त्यांची मालमत्ता यांचा ताळमेळ बसत नसल्याचे एसीबीच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.कवळेकर यांनी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी ज्या मुंबई येथील कंपनी कडून कर्ज घेतले त्याबाबत देखील कवळेकर समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत असे एसीबीचे म्हणणे आहे.गरज पडल्यास या प्रकरणात कवळेकर यांना अटक देखील करण्याचा पर्याय खुला असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे.

धाडी राजकीय हेतुने प्रेरित:काँग्रेस

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर आज ज्या धाडी टाकल्या गेल्या त्या राजकीय हेतुने प्रेरित आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आहे.धाडी टाकण्याची वेळ संशयास्पद असल्याचे सांगून नाईक म्हणाले,काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आणून त्यांना भाजप मध्ये येण्यास भाग पाडण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे.विधानसभा निवडणुकी नंतर काँग्रेसचे 17 आमदार असताना देखील भाजपने एका रात्रीत कसे सरकार बनवले हे सगळ्याना माहित आहे.काँग्रेस आमदारांवर येन केन मार्गाने दबाव आणून त्यांना भाजप मध्ये आणण्यासाठी हे प्रकार सुरु असल्याचा पुनरुचार नाईक यांनी केला आहे...

No comments:

Post a Comment