तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

पाथरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ३९.८१%च पाऊस

पाथरी/प्रतिनिधी:-दहा बारा दिवसाच्या विश्रांती नंतर शुक्रवारी पहाटे पासून पाथरी शहरा सह तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप पुर्ण पणे गेला असून पडणारा पाऊस रब्बी साठी उपयुक्त असल्याचे शेतकरी सांगत असून या वर्षी आता पर्यंत पाथरी तालुक्यात वार्षीक सरासरीच्या ३९.८१% पाऊस झाला असल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्या सह सिंचनाचा प्रश्न गंभिर होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या वर्षी जुन पासून तब्बल चार महिण्याचा कालावधी संपला मात्र समाधान कारक पाऊस न झाल्याने शेतक-यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली अनेक ठिकाणी आजही खरीपाची पिके नाहीत त्यात वाघाळा,बाभळगाव,फुलारवाडी, उमरा,गुंज, लोणी, गौंडगाव, मसला अशी काही गावे पुर्णत: खरीप वाया गेलेली दिसून येतात तर इतर गावात उगवलेली पीके पाण्या अभावी वाळून गेली त्यात मुग,उडीद,सोयाबीन,तुर, कापुस यांचा सामावेश आहे. ज्यांच्या कडे थोडेफार पाणी होते त्यांचे कापसाचे पिक केवळ खर्च काढून देईल मात्र नफा मिळणार नसल्याचे चित्र आहे.गेली चार महिण्या पासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत खरीप तर हातचा गेला आता अपेक्षा होती ती रब्बी ची शुक्रवारी पहाटे पासून पाथरी शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून संपुर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाल्याने नदी ओढे खळखळून वाहिले आहेत.शुक्रवारी पहाटे आणि रात्री ९ वा झालेल्या पावसाने वार्षीक सरासरीत ३७ मीमी ची भर घालत या वर्षी आता पर्यंत ३०६.०० मीमी पावसाची नोंद तहसील कार्यालयात झाली असून ही सरासरी ३९.८१%एवढी आहे पाथरी तालुक्याची वार्षिक सरासरी ७६८.५ एवढी असून पाणी पातळीत वाढ होण्या साठी अजून दमदार आणि जोरदार पावसाची अपेक्षा आहे. गत महिण्यात शेवटी सतत पडलेल्या रिमझीम पावसा मुळे पाण्यावरच्या कापसावर थ्रीप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल पडत आहे. आता पडत असलेल्या पावसा मुळे येत्या आठवडा भरात सुरू होणा-या रब्बी साठी उपयोगी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी पहाटे आणि रात्री तसेच शणीवारी पहाटे पर्यंत ३७ मी मी पाऊस झाला त्या मुळे नदी नाले चार महिण्यात प्रथमच खळखळून वाहिले त्या मुळे वाघाळा येथील लेंडी नदीला पुर आला होता पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून पाथरी-सोनपेठ जाणारी वाहतूक दुपारी १वाजे पर्यंत बंद होती.

No comments:

Post a Comment